Friday, May 8, 2020

जेवणाची थाळी स्टेटस वर ठेवणार्यांनो😡

जेवणाची थाळी व्हाट्स ऍप वर स्टेटस म्हणून ठेवणाऱ्यानो एकदा वाचाच ।




तुमच्या सगळ्या नातेवाईक,मित्र मंडीळीना एव्हाना समजलं असेल तुम्ही खाण्याचे किती शौकीन आहात . तुम्हाला किती छान स्वयंपाक येतो आणि सध्या लॉक डाउन चा तुम्ही किती सदुपयोग केला आहे . हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणी कस वागायचं कस जगायचं. पण आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्याच भान ठेवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे असं आपलं संविधान सुद्धा सांगत.
जसं आपल्या देशावर संकट ओढवलं आहे देशावरच नव्हे तर पूर्ण जगावर तस जणू आपण ते सेलेब्रेट च  करतोय कोणी स्टेटस ठेवतंय चांगले पदार्थ करून तर कोणी छान नटून वेगवेगळे challenges स्वीकारतंय, हो अगदी मी हि तेच केलं पण अचानक एक दिवस माझी मैत्रीन जी विरार ला राहते जिचे वडील सध्या पोलीस म्हणुन कार्यरत आहे तिला फोन लावला . काळजी वाटली म्हणून फोन केला बोलून झाल्यावर तिला सहज विचारलं का ग जेवण झालं का ? तर ती  बोलली नाही अजून पप्पा आले नाही, आले कि सोबत जेवू. 
फोन ठेवला आणि मनात एकच चक्र सुरु झालं ज्यांच्या घरचे आज  देशासाठी झटताय त्यांच्या घाशा खाली घास तरी उतरत असेल का? त्यांच्या मुलांना पण वाटत असेल ना आपण छान छान खावं, त्यांच्या बायकांना वाटत असेल ना नटून एखादा फोटो काढावा.
आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे आपण काय करावं काय करू नए पण माणुसकी प्रत्येकात असतेच.  ते लढताय आपल्या साठीच, त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आली त्यात त्यांचा काय दोष ?  त्यांच्यात जास्त प्रसार होतोय ह्या विषाणूचा ,  त्यांचं काय चुकलं?  आपल्या साठीच करताय ना मग आपण त्यांचा साठी थोडं करूया . समजा आपलं कोणी त्या जागी असेल तर आपल्याला तेवढच वाईट वाटेल जेवढ आज त्यांना वाटतंय. नाही का?



हा फोटो बघून आज कोणती तरी आई आपल्या मुलाला /मुलीला प्रोत्साहित करेल का ?
विचार करण्या सारखी गोष्ट आहे मी सुद्धा त्याच चुका केल्या पण त्याची जाणीव आज होतेय.
मजूर स्थलांतर करीत आहे त्यात  किती तरी स्त्रिया ओल्या बाळंतीण आहेत त्यांचा विचार करून बघा खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही त्यांच्या बाळाला काय पाजत असतील?

तुम्हाला छंद जोपासायचे जरूर जोपासा, राहिलेल काम पूर्ण करा, भविष्याचा विचार करून आज पाऊले उचला.
ह्या संकटात आपण सगळे एक राहिलो तरच मात करू शकू.
दुसऱ्याला  दाखवायचं म्हणून काही करू नका.


हा फोटो तर खूप काही सांगून जातो. घरात किराणा भरायला पैसे नाही आणि यांना स्वतःची मजा मारायला आहेत पैसे.

आपण एका समाजात राहतो संविधानाने जस आपल्याला व्यक्ती स्वातंत्र दिल आहे जसे अधिकार दिला आहे तसेच आपली कर्तव्य सुद्धा बजावलं गेलं पाहिजे हे सुद्धा संविधानच सांगत. आपलं कर्तव्य निभवायची हीच वेळ आहे जरूर निभवूया.
( कुणाच्या भावनांना ठेच पोहचल्यास क्षमस्व 🙏)
पटल्यास जरूर share करा 

3 comments:

  1. खूप छान व परखड मत मांडले.. आपल्या रोजच्या दैनंदिन जिवनात वावरत असताना सामाजिक भान जपणं खूप आवश्यक आहे..����

    ReplyDelete
  2. खूप छान वास्तव मांडल...

    ReplyDelete

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...