Tuesday, May 7, 2019

आईस पत्र! letter to mom!

लिहिण्यास वाईट वाटत आहे कारण जेव्हा आई विषयी बोलायचं असत तेव्हा माझ्या शब्दांना वाचा च फुटत नाही.

पण हीच खरी वेळ आहे मला आई बद्दल जे प्रकर्षाने जाणवतंय ते लिहिण्याची.

माझी च आई नाही तर तुमची सुद्धा आई अशीच असेल, असेल कशाला अशीच आहे हे मी खात्रीने म्हणू शकते. कारण आई आई  असते तुमची असो व माझी. सगळ्यांच्या च जिव्हाळ्याचा प्रश्न.

तर आई बद्दल भरपूर काही !!!!

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला अभ्यासाबरोबर काम करायला लावायची,
पण लग्नानंतर समजलं तुला माझी काळजी, तुला माहित होत बाई म्हटलं कि शिक्षणा बरोबर चूल मूल आलंच.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला माझी चूक नसतांना सगळ्यांशी हसून खेळून रहायला शिकवलं,
म्हणूनच आज हि नणंद-भावजयी , सासू-सुने च छान जमलंय आणि जिवाभावाची नाती जपली गेलीये.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला माझी आवडती गोष्ट share करायला लावायची,
म्हणूनच आज माझ्या ताटातल्या अर्ध्या पोळीवर सुद्धा माझं पोट भरत.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला स्त्री- पुरुष समानता शिकवायची,
म्हणूनच आज नवर्याच्या खांद्याला खांदा लावायची क्षमता आहे.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू माझं कधी पोट भरून कौतुक केलं नाहीस,
म्हणूनच आज छोट्याश्या यशाने मी फुलून जात नाही.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला कधी एकट्याला जगू दिल नाही,
म्हणूनच आज मी सगळ्यांना सामावून घेऊ शकते.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला जास्तीत जास्त चांगलं वाचन करायला लावायची,
म्हणूनच आज माझे विचार प्रगत झाले आहे.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला मला हवी असलेली गोष्ट कधीच तेव्हाच्या तेव्हा दिली नाही,
म्हणूनच आज आहे त्या जीवनाचा आनंद मी घेऊ शकते.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला वस्तू जागच्या जागी ठेवायला लावायचीस किती उशीर झाला असेल तरी,
म्हणूनच आज संसार आणि नौकरी मी व्यवस्थित सांभाळू शकतेय.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू माझी वायफळ बडबड सुद्धा ऐकून घ्यायची नाही,
म्हंणूनच आज माझ्या शब्दांना महत्व आहे.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला व्यायाम करायला लावायचीस,
म्हणूनच आज मी फिट आहे.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला इमोशनल असतांना प्रॅक्टिकल व्हायला शिकवायचीस,
म्हणूनच आज मी भावनेच्या भरात न जाता योग्य निर्णय घेऊ शकते.

हो आई अशा खूप गोष्टी आहे ज्यांचा मला राग यायचा पण आई आज मला आनंद होत आहे कि तू मला वेळोवेळी त्या गोष्टी शिकवल्या कधी कधी मनाविरुद्ध करवून सुद्धा घेतल्या,
म्हणूनच आज जेव्हा लोक माझं कौतुक करतात तेव्हा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतो.
  

3 comments:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...