Saturday, May 23, 2020

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज माध्यमाच्या साहाय्याने आता कुठे तरी या विषयाला वाचा फुटत आहे.  

प्रमोदच सुरु असलेल्या मासिक पाळीच्या संशोधनावरून हि बाब लक्षात आली आणि मह्त्वाचंही वाटलं. जनजागृती झालीच पाहिजे. मासिक पाळी विषय खूप मोठा आहे यावर बोलायची सुरुवातच करायची म्हटलं तर साधारण १२-१३ वर्षाच्या मुलींपासून करायला हवी. सध्याचं वातावरण पाहता पाळी लवकर हि येऊ शकते साधारण १० वर्षांपासून. मासिक पाळी म्हणजे काय? पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी येते  तेव्हा काय काळजी हवी? ह्या गोष्टी  महत्वाच्या आहे कारण भारतात नेमकं याच विषयावर जास्त बोलल जात नाही. आई विचार करते जेव्हा पाळी सुरु होईल तेव्हा सांगू आपल्या मुलीला पण जेव्हा पहिल्यांदा रक्त येते तेव्हा ती मुलगी जास्त घाबरून जाते. हे काय होतंय समजत नाही म्हणून प्रमोद ने आपल्या घरापासूनच सुरुवात करावी असं ठरवलं आणि अवनीला म्हणजेच आपल्या बहिणीला पत्र लिहिलं. 

प्रिय अवनी ,
    आज दादाने असं पत्र का दिल माझ्या हातात असा प्रश्न पडला असेल तुला. आपण जरी एकमेकांच्या खूप जवळ असलो तरी या पत्रात मी तुला जे  काही सांगणार आहे ते तू शांतपणे बसून नीट वाच आणि समजून घे. तुला मासिक पाळी म्हणजे काय हे समजलं कि आपण तुझ्या प्रश्नांचं निरसन करूया. 
     तू आता १० वर्षांची आहेस म्हणजे तुला पुढील १-२ वर्षांत कधीही मासिक पाळी म्हणजेच तुझी (Menstrual Cycle) सुरु होईल. पहिल्या दिवशी थोडा रक्तस्त्राव होईल पण तू घाबरू नकोस. तुझ्या कपाटात मी एक कापड ठेवलं आहे त्याचा वापर तुला या ४-५ दिवसात करायचा आहे. तुझी पाळी सुरु होईल तसेच तुझ्या मैत्रिणींना पण हे सुरु होईल मग तुमच्यात हळू हळू चर्चा सुरु होईल. तू सुद्धा चर्चेत भाग घे यात लाज्ण्यासारखं काहीच नाहीये. तुला कोणी म्हणेल काय त्रास दिलाय मुलींनाच देवाने? 
    हा त्रास नाहीये अवनी, हे तर देवाने दिलेलं वरदान आहे तुम्हा मुलींना. गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून दर महिन्याला अंतरत्वचा बाहेर टाकली जाते त्याला 'मासिक पाळी' म्हणतात. हे ४-५ दिवस जितकं आनंदात घालवता येतील  घालावं.   थोडं पोटात दुखेल पण तू जर नियमित व्यायाम, पौष्टिक संतुलित आहार ठेवलास ना तर तुला  थांबेल. 
    या गोष्टी तू जितकं बोलशील तितकीच तुला मदत होईल. तुला तर माहीतच आहे मी संशोधन करत आहे, तू विचारायचीस ना तू काय शोधात आहेस दादा तर मी हेच शोधत आहे कि तुम्हा स्त्रियांना कोणत्या अडचणींना  द्यावं लागत? काय समस्या येतात? तर मला या दरम्यान हे समजलं कि आपल्या शहरासारख्या ठिकाणी राहणाऱ्या मुलींना या विषयावर बोलायचंच नसतं. उलट ग्रामीण भागात हि गोष्ट समजून घेऊन त्यावर चर्चा केली जाते आणि येणाऱ्या समस्या सोडवल्या जातात. 
    शहरातल्या मुलींना आपण कापड वापरतो हे सांगायला त्यांना लाज वाटते. खरं तर कापडाचा वापर करण हेच योग्य आहे हे जितकं ग्रामीण भागातल्या स्त्रियांना कळत ते शहरातल्या स्त्रिया समजून घेत नाही. हि गोष्ट तुही समजून घे, कापड आपण आपल्या हाताने स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळवून वापरू शकतो. अर्थात घरी असेल तर या गोष्टी करता येतील पण आजकाल मुलींना कामानिमित्त १२-१२ तास घरापासून लांब रहावं लागतं म्हणून sanitary napkin चा वापर केला जातो.   
    तुझी पहिली पाळी कधी  काही आपल्या हातात नाहीये म्हणजे तू तेव्हा कुठे असशील? घरात असेल कि शाळेत? तू घरी असली तर घरात आई आहे बाबा आहे आणि कोणी नसलं तर मला निसंकोचपनणे सांगायचं. घाबरून जायचं नाहीस. समजा तू शाळेत असली तर तुझ्या बाईंना किंवा गुरुजींना  सांगायचं यात लाज वाटू द्यायची नाही.    
    

No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...