Friday, May 3, 2019

महत्व अक्षय त्रितीयेचे | Importance of AKSHAY TRITIYA




वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. अक्षय तृतीया साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. 
हा एक शुभ दिवस मानला जातो. जे काही महत्वाचे काम असेल ते याच दिवसाचे औचित्त साधून केले जाते.

या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

महत्व  
  1. या दिवशी बद्रीनारायणाच्या बंद मंदिराचे दार उघडतात आणि दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी बंद केले जाते. 
  2. नर-नारायण या जोडीने याच दिवशी अवतार घेतला होता. 
  3. या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे असे श्री कृष्णाने युधिष्टिराला सांगितले होते.  
  4. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते. 
  5. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. 
अक्षय तृतीयेला हे करावे 

  • या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
                                                                                                 
  • या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.
  • या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
  • सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात

भारताच्या इतर राज्यात अक्षय तृतीया 
  • उत्तर भारत 
परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.
  • दक्षिण भारत 
लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते. अन्नदान करणे, मंदिरात जाणे असे आचरणात आणतात. 
  • पश्चिम बंगाल 
हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी वर्गात महत्वाचा दिवस मानला जातो. 

  • ओडिसा 
या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. लक्ष्मी देवीची पूजा करून नवीन धान्य पेरले जाते. जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो. 
  • राजस्थान 
आखा तीज या नावाने ओळखला जातो. या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे. 

1 comment:

  1. thank you so much.you gave your precious time for my blog. i hope you will love this blog further also.

    ReplyDelete

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...