Thursday, May 2, 2019

विलक्षण | VILAKSHAN

कीर्ती आणि राहुल ची जोडी सगळ्यांनाच आवडायची. त्यांचा प्रेम विवाहच आहे असच सगळ्यांना वाटायचं. छान चालला होता त्यांचा संसार. 
तस म्हणायला गेलं तर कीर्ती च्या आयुष्यात विलक्षण असं काही घडावं इतकं काही तिचं वय नाही. पण तिचा  स्वभाव बघता ती खूप भावनिक, संवेदनशील आणि कदाचित वया पेक्षा जास्त लवकर समज आल्याने जास्त विचार करणारी. 
घरात सर्वात लहान, लाडकी, हुशार, चुणचुणीत बालका पैकी एक. एकपाठी, शिस्तबद्ध, प्रामाणिक, सोज्वळ अशी कीर्ती. 
कामास काम ठेवणे हि शिकवण अगदी लहानपणापासून बाळगून ठेवलेली म्हणून च कि काय कोणाशी कधी भांडणाची वेळ आली नाही आणि एखाद्याला तिच्यासोबत भांडायचं जरी असेल तरी तीने त्याला तशी कधी संधीच देऊ दिली नाही. 
छोट्या छोट्या गोष्टींचा तिच्या मनावर खूप परिणाम व्हायचा आणि विचारांच्या जाळ्यात अडकून राहायची. म्हणूनच तिच्या आई ने तिला एकच गोष्ट सांगितली होती जेव्हा तिची जवळची मैत्रीण तिच्याशी चुकीचं वागली होती म्हणून तीने आई जवळ बोलून दाखवलं होत तेव्हा आई  बोलली तू जन्माला एकटीच आली आहेस आणि मरणार सुद्धा एकटीच आहेस तू ठरव तुला ह्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा आहे कि करिअर वर लक्ष द्यायचं आहे. आई च काही चूक नव्हतं तेव्हा कीर्तीचा स्वभाव पाहता तिच्या हितासाठी च बोलली होती ती. 


त्या नंतर तिला कुणाचा कधी राग केला नाही कि कोणासोबत स्पर्धा करावीशी वाटली नाही. ती जशी आहे तशी खुश होती. आई वडिलांच्या चौकटी बाहेर जायची कधी हिम्मत केली नाही आणि त्यातच तिला आनंद होता. आजू बाजूचे नातेवाईक तिच्या बद्दल भरभरून बोलायचे. 
तसेच तिचे बाबा सुद्धा काटेकोर, मान होता त्यांना समाजात, आणि याची जाण कीर्तीला होती. स्वाभिमानी माणूस स्वतःच्या कष्टाने नाव कमावलं होतं, कधी कोना समोर हात पसरवले नव्हते आणि तेच कीर्तीने अगदी अचूक हेरले होते. तिचे बाबा नेहमी म्हणायचे आपण स्वतः इतकं कमवायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं कि आपल्याला दुसर्याने नाकारायलाच नको. खूप स्वप्न पहिले होते त्यांनी कीर्ती साठी. 
ह्याच वातावरणात ती मोठी होत होती वयाने आणि डिग्री ने सुद्धा. हवी होती ती डिग्री भेटली आणि आता सर्वसामान्य मुली प्रमाणे तिच्याही घरचे तिच्या लग्नाचे स्वप्न रंगवू लागले. त्यांना जास्त स्थळ बघावे लागणार नाही हे पक्के माहित होत कारण कीर्ती तशी गुणी होती कोणाच्या हि मनात पटकन बसेल अशी होती. २२ वर्षे कधी आई वडिलांना सोडून न राहिलेली ती एका अनोळख्या व्यक्ती सोबत आयुष्य घालवणार होती. पण ती निर्धास्त होती तिचे बाबा जो कोणी मुलगा तिच्या साठी निवडतील त्याच्या सोबत ती डोळे झाकून लग्न करायला तयार होती आणि हे त्यांना माहित होत. 
कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि मुला कडच्यांनी लगेच पसंती कळवली. बाबा खूप खुश होते तिला हि विचारलं तिचा हि होकार होताच. घरात खेळीमेळीचं वातावरण होत. आता लग्नाची तयारी करायला हवी असं म्हणतच मुलाच्या आई ला बघायला यायचं असा फोने आला होता, तसे ते आले पण बरेच दिवस होऊनही काही उत्तर च नाही आलं. विचारपूस केली असता मुलगी सावळी आहे असं त्याच्या आई च म्हणणं होत जे चुकीचं होत म्हणून बाबा ची चिडचिड झाली होती, त्यांना मुलगा मनापासून पसंत होता आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार आहे आणि त्यांना हे स्थळ गमवायचा नव्हतं. काय करावं ते सुचत नव्हतं, त्यांनी मुलीला परत बघून घ्या हवं तर असं सुचवलं मुलाकडच्यांना. 
तिचे बाबा विचार करू लागले मी माझ्या मुलीला 'साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी' अशी शिकवण दिली पण हे विसरूनच गेलो समाजात त्याला काही किंमत नाही. स्वतःच्या मनाविरुद्ध ते हे सगळं करत होते मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हणून. चांगलं स्थळ परत परत येत नाही हे त्यांना ठाऊक होत. 
जो स्वाभिमानी माणूस कधीही कोणासमोर हात न पसरवणारे कीर्तीचे बाबा आज मुलीच्या हिता साठी हेही करायला तयार झाले. कीर्ती सोबत कसं बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं पण कीर्ती काही न सांगताच समजून गेली, ती काही बोलली नाही कारण तिला माहित होत तीने परत दाखवायचा कार्यक्रमाला नकार दिला तर बाबांना खूप वाईट वाटेल म्हणून स्वतःच्या मना विरुद्ध स्वतःचा रंग सिद्ध करण्यासाठी ती पुन्हा तयार झाली. 
मुलगा खरंच समजूतदार होता नंतर काही आढेवेढे न घेता होकार आला आणि लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. 

पण कीर्ती साठी बाबांचं असं वागणं खूप विलक्षण होत, का कुणास ठाऊक त्या नंतर ती आपल्या रंगाबद्दल जास्त 
काळजी घेऊ लागली तिच्या मनात भीती बसली कि लग्नानंतर जर परत तिच्या सासूने बोल लावले तर?
तिला तिच्या बाबांनी पूर्ण स्वतंत्र दिलं होत ती हे स्थळ नाकारू शकली असती पण तिचे संस्कार म्हणा किंवा तिच्या आई बाबांचं प्रेम म्हणा तिच्या आड आलं आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला. तिच्यावर कोणाची जबरदस्ती नव्हती. तिला फक्त बाबा असं का वागले याबद्दल तक्रार होती. नंतर तीही दूर झाली, पाहिलं तर कीर्तीच चांगलंच झालं होत, खुश होते दोघे. बाबांनी असा निर्णय घेतला याच महत्व तिला पटलं होत. बाबांचा निर्णय योग्य ठरला होता. 
पण आजही २१ व्या शतकात मुली इतक्या शिकून सगळ्याच क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत असतांना त्यांना रंग आड येतोच??
तुमच्याही आजूबाजूला हे घडतंच असेल ना. 

प्रत्येकाला गोऱ्या रंगाचीच बायको का हवी आहे? कधी बदलेल हि मानसिकता समाजाची ?


No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...