Friday, August 3, 2018

बिन रक्ताची नाती

आजच्या धावपळीच्या जगात जिथे फ़क्त पैसा महत्वाचा झालाय तिथे रक्तच नात नसणाऱ्या मानसाबद्दल आपुलकी वाटन सहसा बघायला मिळत नाही. पण यालाही अपवाद आहेच.  कोण  कुठे कुणाची आणि कशी काळजी घेईल याची प्रचिती नुकतीच आली. कामानिमित्त सिन्नर नाशिक हा माझा रोजचा प्रवास सिन्नर शहदा बस ने सुरु होतो. बरेच दिवस होत आले होते एक रिक्शावाले आजोबा त्या बस ची नित्याने वाट बघत होते. आमची काही ओळख नव्हती आणि आमच्यात काही बोलनही होत नव्हत. ना मला त्यांच नाव महित होत न त्यांना माझ. का कोणास ठाऊक मला कधी विचारवास वाटल नाही. चार -पांच दिवस झाले ते काही बस स्टैंड वर दिसले नाही. पहिला विचार आला त्यांना दूसरा प्रवासी भेटला असेल. मी दुसऱ्या रिक्शा ने जाऊ लागले. रिक्शा खुप असायच्या पण तरी ते आजोबा कुठे दिसताय का ते बघायचे आणि नंतर दूसरी रिक्शा पकडायचे.  एक दिवस मी ठरवलच आजोबाची चौकशी करायची. नाव माहीत नसल तरी रिक्शा चा नंबर महित होता. त्या दिवशी मी बस मधून उतरली आणि समोरच एक रिक्शा अभी होती. तय काकानी माला एक-दोनदा सोडल होत म्हणून पत्ता न सांगताच रिक्शा मधे बसले. मि काही विचारायच्या आत ते काका बोलले , आजोबांना पैरलिसिस चा अटैक आलाय. 'त्यांनीच मला सांगितल की, सिन्नर-शहादा बस ने एक मॅडम येतात, त्यांना घेऊन जात जा.' ऐकून मन सुन्न झाले. ते इतके आजारी असताना त्यांच्या मनात माझा विचार यावा, या जाणिविने गहिवरून आले. आजही दुसऱ्याचा विचार करणारी माणस या जगात आहे. ते लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना. 

1 comment:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...