Friday, August 24, 2018

दुधावरची साय



म्हणतात ना माणूस काही आई च्या पोटातून सगळं शिकून येत नाही. पण माणूस संस्कारातून नक्कीच शिकतो. हि गोष्ट आहे चौघी बहिणीची, सर्वात मोठी मीरा नंतर लता,शरयू आणि सगळ्यात लहान विद्या. त्यांच्या नावाप्रमाणे च त्यांची वागणूक.  नुसत्या रक्ताच्या नात्याला  बांधील आहे म्हणून नाही तर त्यांच्या वागणुकी वरूनच कोणीही पटकन म्हणत हे तुम्ही  यशोदा च्या मुली  ना ? असं ऐकल्यावर किती अभिमान वाटतो आई ला आणि तिच्या मुलीनी हि ते आपल्या संसारातल्या यशाने सिद्ध केलंय.  आम्हीही प्रयत्न करतोय आमच्या आई ला अभिमान वाटेल असा संसार करायचा.  अर्थात यशोदा म्हणजे त्यांची आई आणि आमची आज्जी. ती हि नावाप्रमाणे च.. फणसा सारखी  
आम्ही सगळे बारा मावस भाऊ बहीण... सगळ्यात लहान मी. आज्जी  नेहमी म्हणायची आपल्या वागणुकी वरून आपलं स्टेटस ठरत. मला आधी काही कळायचं नाही पण जस जसे मोठी होत गेले शिक्षण  झाले लग्न झाले तेव्हा जाणीव झाली, हे सगळं काही मी अचानक शिकले नाही हे तर आई ने लहान पणा पासून जे संस्कार केलेत त्याच फळ आहे, त्या हि उपर आई ला हे कोणी दिले तर माझ्या आज्जी  ने. 
आज खूपच आठवण आली आज्जी ची, रक्षाबंधन  जवळ आलंय ना. माझ्या सगळ्या सासुर वाशीण बहिणी दर रक्षाबंधन ला येतात  आणि आजी जिथे असेल तिथे आम्ही सगळे एकत्र सेलेब्रेट करायचो. माझं लग्न काही झाले नव्हते तेव्हा मी हि सगळ्या बरोबर बहिणी ची वाट बघत होती सगळ्याना  फोने झाले सगळे  ज्याच्या त्याच्या घरी आले होते पण खूप पाऊस असल्या मुळे आम्ही दुसऱ्या दिवशी भेटायचे ठरवले. त्याच रात्री आजी ची तब्येत बिघडली आणि तिला ऍडमिट केले. सगळे आपोआप एकत्र जमले. त्या दिवशी रक्षाबंधन ला एकत्र आलो नाही त्याच आज्जी  इतकं मनावर घेईल असं  वाटलं नव्हतं. दोन-तीन दिवस आजी हॉस्पिटल मधेच होती पण तिला आता ते वातावरण नकोसे झाले होते. तशी आजी ठीक होती म्हणून आम्ही घरीच तिची सेवा करायचे ठरवले. घरी आणल्यावर काही वेळातच तिने आपला जीव सुखासुखी सोडला हो सुखासुखी,कारण "ती जाताना म्हणाली नका रडू माझं सगळं झालाय,मला तुमच्यात अडकवू नका मी सुखाने जात आहे". जाताना हि तिने दुसऱ्याचा विचार केला. ती ८५ वर्षाची होती पण स्वतःचे काम स्वतः करायची कोणावर अवलंबून नव्हती. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी आता आठवतात आणि लक्षात येत हे तर आजी कडून आलंय  आपल्या मध्ये.   
आजी च्या सहवासात आता  पर्यंत जे कोणी राहिलाय ना खूप काही शिकून गेलंय, पण वाईट याच वाटत कि मला खूप काही शिकायचं राहिलय, आजी ने त्याची हि सोय करून ठेवलीये ते म्हणजे माझी आई आणि माझ्या मावश्या. 
माझं आणि आजी च कधी इतकं पटलं  नाही किंवा तेव्हा शिक्षण चालू असल्यामुळे मला बोलायचं महत्वाचं वाटलं नाही. माझं लग्न झालाय आता, माझ्या घरी मला अचानक संध्याकाळी आजी ची आठवण येते आणि मी मनात जरी म्हटले ना आजी ये ग खूप कंटाळा आलाय, थोड्यावेळात लगेच गाईचा हंबरडा ऐकू येतो नाही तर कावळ्याची कावकाव. माझा  या वर विश्वास नाही पण आता स्वतःची समजूत काढते.  
आज हि त्या चौघी एकमेकांना सांभाळून आहे.  लग्न झाल्यावर कळत  आई ची माया. त्यांनी तर माया गमावली आणि आम्ही दुधावरची  साय.... ह्या हि वयात  त्या तरुण आहे त्यांच्या  मॉडर्न विचारांनी.  सगळं ज्याच्या त्याच्या घरी खुश आहे. पण आठवण येतेच.      

4 comments:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...