Tuesday, August 28, 2018

रक्षा भावाची कि बहिणीची


आत्ताच रक्षाबंधन चा सण झाला. भारतीय संस्कृतीतला बहिन भावा च्या नात्यातला पवित्र सण... अस म्हणतात बहीण भावाच्या मनगटावर रक्षणाचा धागा बांधते... पूर्वी च्या वेळी ठीक होत हो तेव्हा भावाला गरज असायची रक्षणाची... पण ह्या कलयुग मध्ये रक्षणाची गरज खरंच भावाला आहे कि बहिणी ला???
रोज वर्तमान पत्र हाती घेतलं कि एक तरी बातमी असतेच अत्याचाराची... दोन वर्षाच्या मुलीला सुध्दा सोडत नाही हे नराधम... आणि आपण आहेच नंतर त्यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चे काढायला... एवढाच आहे का आपल्या हातात???
माझं तर मत आहे प्रत्येक भावाने आता बहिणीला च राखी बांधायली हवी आणि शपथ घ्यायला हवी रक्षण करायची...विकसनशील देश आहे ना आपला भारत पण असा विकास काय कामाचा जिथे आपल्या मुलीच सुरक्षित नाहीये... आज हि रात्र व्हायला झाली कि सगळ्या पालकांना चिंता पडते आपल्या मुलीची.. अहो मुलगी च काय बायको आई जरी लवकर घरी नाही ना आली तरी जीव घाबरा होतो.
आणि आपण म्हणतो मुली आज चंद्रावर जाऊन पोहचलाय... सगळं खरं आहे पण सर्व सामान्य मुली अजून हि गाव गुंडाच्या भीतीने आत्महत्या करत आहे... अहो ती वृत्ती तरी किती विचित्र आहे अत्याचार करतात तर करतात वरून जीव सुद्धा घेतात... कोणी अधिकार दिला त्यांना???
याला जबाबदार कोण आहे??? सोशल मीडिया,इंटरनेट, कि संस्कार???
कि मुली छोटे कपडे घालता ते जबाबदार आहे याला. पण अंगभर साडी घातलेली बाई सुद्धा या नराधमांच्या वासनेला बळी पडतेच ना. आणि संस्कार कसे  जबाबदार असतील हो, कोणते तरी आई वडील आपल्या मुलाला असा शिकवतील का?
मग लोकांची वृत्त्ती अशी का झालीये??
माझ्या मते तरी आपल्याला गरज आहे एका नवीन चांगल्या बदलाची...


2 comments:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...