Wednesday, August 29, 2018

Life of a Girl


प्रत्येक मुलीच च स्वप्न असत आपल्या आई वडिलांसाठी खूप काही करायचं...तिला जाणीव असते त्यांच्या कष्टाची त्यांच्या त्यागाची... आई वडिलांना सुद्धा हेच अपेक्षित असत त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं... पण शेवटी समाज,संस्कृती मध्ये येतेच.. मुलीला योग्य ते शिक्षण देतात,आता ती तिच्या पायावर उभी राहायला तयार असतेच कि त्यांना वाटत आता लग्न करून द्यायला हवं.. त्यांना वाटण्या पेक्षा समाज च त्यांना जास्त डिवचत असतो.. कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलीचं चांगलं व्हावं असाच वाटत... आणि ती लग्नाच्या बेडीत पडते... माझं म्हणणं अस नाहीये कि त्यांनी लग्न करून चूक केली पण त्या मुलीच्या स्वप्नांचं काय जे तिला त्यांनी च दाखवले होते..
सगळे च सासर चे  सारखेच नसतात..आजही  खूप नवरे ,सासू,सासरे आपल्या बायको,सुनेला पूर्ण पाठिंबा देतात.. पण अजूनही असे घर आहेत कि  सुनेला स्वतःचा मनाविरुद्ध च वागावं लागत... सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ती स्वतःच अस्तित्व च गमावून बसते... एक ना अनेक अपेक्षा चा पूर ती आयुष्यभर डोक्यावर ठेऊन असते...


एकदा लग्न झाले कि मग घरच्यांना समजून घेता घेता दिवस कसे जातात ते कळतच नाही.. तिला तीच कुटुंब आणि कॅरियर यात कुटुंब च निवडावं लागत, नंतर तिला दिवस राहतात मग तर काय डोहाळे पुरवून घेण्यातच दिवस निघून जातात, एकदा मुल झाले कि त्याच्या संगोपनात अनेक वर्षांचा गॅप पडतो.. तेव्हाही तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही... तिला जाणीव होते ती,जेव्हा स्वतःचे मुलं शाळा आणि इतर कामात  busy होतात.. मग तिला आठवत कि आपलं अस्तित्व काय... ज्यांच्या साठी ती सगळं सोडून देते तेच त्यांच्या  करिअर साठी तिच्या पासून लांब जातात... 
मग तिच्या कॅरियर च काय??? तिने तर किती गोष्टीचा त्याग केलाय आपल्या संसारासाठी मग आपण तिच्या साठी काहीच करू शकत नाही का??? प्रत्येक नवऱ्याने  आपल्या बायको चा आदर केलाच पाहिजे, तिच्या स्वप्नासाठी धडपड केलीच पाहिजे.. शेवटी ती तुमची  betterhalf आहे. नावा प्रमाणेच तीने सगळं काही केलंय त्याही पेक्षा जास्त... 
आपण हि थोडंफार तिच्या साठी करूया... 

No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...