Friday, August 31, 2018

चुलबुली वीणा



माझी मैत्रीण वीणा.. नाव च किती गोड आहे... मैत्रीण म्हटलं कि बरेच काही येत मनात... म्हणजे आपली तिच्या सोबत किती जुनी मैत्री आहे, किंवा आपल्याला तिच्या बद्दल कितपत माहित आहे... तिच्या आवडी निवडी... तिच्या strength तिचे weak point आणि बरंच काही... 
खरंच या गोष्टी इतक्या गरजेच्या आहेत का?? आपण आत्ता तर तिला ओळखतो ना आणि तिला judge का म्हणून करायचं? प्रत्येकाला आपलं खाजगी आयुष्य असत मग आपण त्यात ढवळाढवळ का म्हणून करायची? आपण आपलं नातं असा बनवायचा प्रयत्न करायचा कि त्या व्यक्तीला आपणहून आपल्या सोबत सुख दुःख share करायला आवडायला हवं... मग ते नातं कोणतंही असुदे नवरा-बायको च,मित्र-मैत्रिणी च किंवा अजून कोणतंही... 
आमचं नातं आहे मैत्रीचं.. पण मला तिच्या बद्दल काही एक इतकं detail मध्ये माहित नाही... ती इंजिनीरिंग ला असताना माझी classmate होती इतकंच नंतर काही contact सुद्धा नाही... आमची नव्याने ओळख झाली ती माझ्या जॉब च्या ठिकाणी...ती माझ्या आधी तिथे होती... तिने च मला सगळं समजून सांगितलं होत... ती खूप भारी आहे... चुलबुली... नावाप्रमाणे... सगळं इतकं freely handle करते... हा थोडी नादान बालिश आहे पण तिचा तो बालिश पणाच इतका भारी आहे ना कि तिच्या वर जास्त वेळ मी राग च भरू शकत नाही... आम्ही दोघी इतकं opposite आहे आचार विचारांनी... पण तरी एकत्र आलो कि विचार एक होऊन जातात.. ती मला प्रत्येक कामात support करते...हा blog सुद्धा तिच्या च मदतीने create केलाय, नाही तर अजून मी विचार च करत असते कधी ब्लॉग बनवायचा... 
मी थोडी तिच्या सोबत कठोर वागते कारण मला मनापासून वाटत तिला कोणी चिडवू नये, तिच्या कडून काही चूक होऊ नये जेणे करून तिला कोणी बोलू नये... तिला हि कदाचित ते कळत असेल म्हणून ती ऐकून घेते माझं ... ती life खूप छान enjoy करते... तिच्या tatoo प्रमाणेच ती सगळ्यांना सांगते be free (from negativity)... आधी मी प्रत्येक कामाचं tension घ्यायचे आणि ती बिनधास्त राहून आपली काम पूर्ण करायची... 
तिच्या सोबत राहून मीही थोडंफार life enjoy करायला शिकली आहे... अशी मैत्रीण प्रत्येकाला हवी...कामाच्या ठिकाणी तर हवीच हवीच... आपलं load हलका करायला...आपणच नाती जपायला हवी... उगीच इगो काय कामाचा... इगो च्या नादात कदाचित आपण एखाद सुंदर नातं गमावून बसू शकतो.. ती नेहमी म्हणते stay focus and happy at the same time...then you win every situation in life ☺  

1 comment:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...