Tuesday, September 4, 2018

शिक्षक



तस पाहिलं तर हे विश्व च आपला शिक्षक आहे.... या विश्वातील एकूण एक गोष्ट आपल्याला काही न काही शिकवत च असते...कासव आपल्याला एक सारखी गती ठेऊन कस जिंकायचं हे शिकवत तर ससा आपल्या गुणांचा अहंकार बाळगू नये हे सांगते...झाडं आपल्याला विनास्वार्थ दुसऱ्याला आपल्याकडील चांगल्या गोष्टी द्यायला शिकवते. 
सर्वात मोठे शिक्षक तर आपले आई वडील...आपण कितीही चुका करो पण नेहमी त्या सुधारवायचा प्रयत्न करणारे, हाताला धरून शिकवणारे आणि आई वडिलांनंतर कोणी असेल तर आपले शिक्षक... आई वडीलां सारखीच माया करणारे, ओरडा देणारे, संस्कार करणारे... आपल्या अधोगतीत स्वतःचा अपमान मानणारे असे शिक्षक...
मला सगळ्याच शिक्षकांचा आदर आहे... आज मी जे काही आहे ते त्यांच्या मुळेच... त्यांच्या पैकी च एक पाठक सर...पाठक सर संस्कृत चे विशारद... त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये कधी भेद भाव केला नाही किंवा कोणाच्या बुद्धी वरून कधी कमी लेखलं नाही... सगळ्यांना समान वागणूक देणारे आणि वेळ आली तर स्वतःच्या मुली प्रमाणे समजून ओरडा देणारे सर मला लाभले...
आम्हाला संस्कृत सुरवातीला जड जायचं पण सरांनी त्यांच्या शैलीतून आपोआपच गोडी लावली आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बरचसं ज्ञान आम्हाला दिलं... त्यांनी आम्हाला सर्वात पहिले रामरक्षा आणि अथर्वशीर्ष वाचायला शिकवलं...तेव्हा आम्ही १० वीत होतो...कधी कधी कंटाळा यायचा म्हणायला पण सरांची शिस्त च अशी होती कि कधी खाडा केला नाही.. त्याचा च परिणाम आज हि तोंडपाठ आहे आणि कधी कसली भीती वाटली आणि स्मरण केलं कि सगळं नीट होतं...
पण इंटरनेट च्या दुनियामध्ये आज काल च्या मुलांना खऱ्या शिक्षकाचा आदर राहिला नाहीये... इंटरनेट वरून आपण कोणतीही गोष्ट पटकन मिळवू शकतो पण त्याला शिक्षकाची सर येत नाही... संस्कार तर काही गुगल शिकवू शकत नाही...
आज सगळे व्यस्त आहेत ज्याच्या त्याच्या कामामध्ये पण त्यांचा प्रत्येक विद्यार्थी वर्षातून दोनदा न विसरता सर ना फोन करतोच...आपल्या आयुष्याकडे पॉसिटीव्ह बघण्याचा दृष्टिकोन देण्याऱ्या शिक्षकाला माझा प्रणाम... 
आणि लहानापासून मोठ्यापर्यंत रोज काहीं काही शिकवणाऱ्यांना सुद्धा माझा प्रणाम...

1 comment:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...