Monday, September 10, 2018

प्यार से बात करके तो देखो

आज ची तिची दिवसाची सुरुवात जरा चिडचिडीत च झाली... कारण शुल्लक होत पण तिला चिडायला तेवढ हि पुरेसं होत ...आणि राग तो कोणावर काढायचा तर जेवणावर.. नेहमीच होत तीच ... तस तिला माहित होतं काही न खाता बाहेर पडलो कि अजून दिवस वाईट जातो तरी ती तशीच घराबाहेर निघाली... त्यात भर म्हणजे बस ला महामूर गर्दी , पाय ठेवायला सुद्धा जागा नाही... अजून च चिडचिड ..तिला नेहमीच गर्दी पहिली कि नकोस व्हायचं बस मध्ये पण वेळेवर पोहचायचं तर तीच बस पकडावी लागणार होती म्हणून आत मध्ये शिरली खरी तर कोण कोणाला ढकलत होता आणि मागून च लोक ढकलत आहे असा बोलून मोकळं व्हायचा... अरे पण गर्दीत लहान मुलं म्हातारी माणसं अपंग व्यक्ती असतात त्यांचा कोणीच विचार करत नव्हतं... हिने कस बस पाय ठेवायला जागा केली आणि उभी राहिली...
बस कंडक्टर आला आणि  ओरडायला लागला ए चला रे मागे सरका , ए म्हातारे कशाला ग आली एवढ्या गर्दीत चल हो बाजूला , ओ मॅडम नंतर बोला आता गर्दी पहा केवढी आहे , अरे ए पोऱ्या चल हो बाहेर नाही तर उतर  बस खाली , कुठून कुठून येता लोक काय माहित असा बराच काही... इतक्या अरे रावी पणाने बोलण ऐकून तिला जरा कसस झालं पण एवढ्या लोकांमध्ये काय बोलणार म्हणून गप्प राहिली... हा कोण सांगणारा कोणी बस मध्ये यायचं कोणी नाही यायचं , कोणी कधी फोन वर बोलायचं , मनातल्या मनात शिव्या देऊन ती शांत उभी राहिली पण अजून शाळा कॉलेज चे मुलं खाली उभीच होती कारण  त्यांच्या कडे मासिक पास होता आधी तिकीट वाली माणसं भरायची मग जागा असेल तर कॉलेज चे मुलं ... हा कोणता न्याय आहे.. त्यांनी पैसे तर भरले च आहे  ना मग कंडक्टर ला हा हक्क कोणी दिला असा स्वतःशीच पुटपुटून परत शांत बसली...कशाला रिकामं कोणाशी डोकं लावायचं आणि आपल्याला काय त्यांना बस मध्ये जागा नाहीये ना मग कशाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं त्यात आपण मुलगी ... 
कशीबशी बस सुरु झाली आणि आणखी एक प्रवासी घाई घाई बस मध्ये चढला... त्याला बिचार्याला काय माहित होता कंडक्टर किती तुसड्या तोंडाचा आहे... तो चढला आणि लगेच कंडक्टर ओरडला ए इथे उभं राहू नको चल निघ माग ... इतक्या गर्दीत सुद्धा तो त्या कंडक्टर ला बोलला... "भाऊ जातोच आहे मागे थोडं प्रेमाने सांगितलं असत ना बस च्या टपावर पण जाऊन बसलो असतो".. असा ऐकून बस मध्ये एकच हशा पिटला आणि कंडक्टर थोडासा खिजला, प्रवाशी मनोमन सुखावले, बरं झालं कोणी तरी बोललं...
आणि तिला सकाळची चिडचिड आठवली खरंच आपण थोडं प्रेमाने घेतलं असत तर चिडचिड झालीच नसती किती गरज आहे आपल्याला प्रेमाने बोलायची.. प्रयन्त करून बघा नेहमी आनंदी आणि प्रेमाने दोन शब्द बोलायचं आपोआप माणसं जोडली जातील... उगीच चिडचिड करून दहा काम बिघडवण्या पेक्षा एक smile देऊन चार काम तर नीट करा...   

No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...