Monday, September 10, 2018

बेफिकरे

कालच एक बातमी वाचली फेसबुक वरच, हो आज काल वेळ मिळत नाही पेपर हातात घेऊन वाचायला हे ऐकायला आता कॉमन झालंय कारण फोन मध्ये असलेलं सोसिअल मीडिया सगळं काम सोप्प करून टाकत... तर बातमी अशी होती कि , फक्त फेसबुक मार्फत ओळख होऊन एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर तब्बल एक महिना बलात्कार केला... बरं तरुणी आहे पुण्याची शिकण्यासाठी आलेली आणि तरुण मुंबई चा... फेसबुक वर ओळख झाली आणि त्याने तिला आपल्या घरी जेवायचं आमंत्रण दिल आणि ती गेलीही, जेवण झाल्यावर रात्री उशीर होईल म्हणून त्याने तिला स्वतःकडे थांबून घेतलं सकाळी ती दार उघडायला गेली तर त्याने तिला कोंडून घेतलं होत नंतर तिच्या वर बलात्कार केला तिने पळून जाऊ नये म्हणून तिचे कपडे फाडले केस कापले त्यात त्या तरुणाची आई सुद्धा घरात होती... तिची सुटका झाली ती एका मांजरी मुळे त्याच्या घरात १०-१२ मांजरी होत्या त्यातली एक गॅलरी मधून खाली पडली म्हणून त्याच्या आई ने तिला त्याचे कपडे दिले आणि खाली पाठवलं त्याचा फायदा घेऊन तिने पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं ...म्हणजे त्याची आई सुद्धा त्याला सामील होती का ?  
हो बातमी अशीच होती आता पोलीस करतील शहानिशा, पण विचार केला तर ती मुलगी शिकण्यासाठी बाहेरगावी आलेली आणि तिच्याशी जर एक महिना भर काही संपर्क होतं नसेल तर तिच्या घरच्यांनी पोलिसाकडे तक्रार कशी केली नाही... आणि केली जरी असेल तरी इतका एक महिना त्या मुलीने काहीच कसा प्रयत्न नाही केला ?? असो जे झालं ते खूपच वाईट होत... 
पण मुलांनो विचार करा आपल्याला आई वडिलांनी एव्हडी मोकळीक दिली आपल्यावर विश्वास ठेऊन बाहेर ठेवतात शिकायला का तर त्यांना आपल्या कडून खूप काही अपेक्षा असतात... सगळेच च यशस्वी होतात अस नाही पण काही चुकीचं तर होणार नाही याची काळजी आपण घेऊ च शकतो ना...आपल्या आजूबाजूला किती तरी लोक असतात बोलायला मग आपण online chatting च्या भानगडीत च का पडतो... 
किती तरी मुलं वाईट मार्गाला लागतात तिकडे आई वडील कष्टाने पैसे पुरवतात आणि इकडे हे मस्त मजा करतात नाहीच काही तर मग social media वर वेळ वाया घालवतात.. मान्य आहे हे वय असतंच असं पण घरच्यांना सुद्धा तेवढीच काळजी घ्यायला हवी आणि मुलांनी देखील जबाबदारी ने वागलं पाहिजे नाही तर अशा काही चुका होऊन जातात कि आयुष्यभर सुधारू शकत नाही... 
किती तरी लोकांनी फेसबुक च्या माध्यमातून कॅरिअर घडवलं आहे किती तरी लोक चांगले विचार मांडत असता तर कित्येक जणांनी नवीन business सुरु केलाय ... खूप काही नवीन शिकायला असत पण नेमकी हि कोवळ्या वयातील मुलाचं वाईट गोष्टींच्या आहारी पडतात आणि मग नको त्या  होऊन बसतात... 

1 comment:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...