Friday, September 14, 2018

खादिम इंडिया

रॉय बर्मन हे नाव आधी कोणाला माहीतही नसेल पण आता हेच नाव प्रकाश झोकात आलंय, भारतीय मार्केटमध्ये ४० हजार कोटी रुपये मिळकत असणारी ‘खादिम इंडिया’ या कंपनीचे ते मालक आहेत.  
रॉय यांचा प्रवास चपलाच्या दुकानात काम कऱण्यापासून सुरु झाला आणि आता त्यांची स्वतःची कंपनी, स्वतःचा चप्पल चा ब्रँड आहे... या प्रवास दरम्यान त्यांना खूप संघर्ष करावा लागला... प्रत्येक असामान्य माणूस जसा खडतर परिश्रमातून घडतो तसेच रॉय सुद्धा घडले... 
त्यांचं पाहिलं चप्पलांचं दुकान चितपूर मध्ये सुरु झालं.. दुकान बऱ्यापैकी सुरु असताना त्यांना स्वतःच उच्चप्रतीचे चप्पल तयार करून लोकांच्या पसंतीस उतरावे असा वाटू लागलं आणि त्यांनी त्यानुसार तयारी सुरु केली... बऱ्याच परिश्रमानंतर 'खादिम इंडिया' नावाचा ब्रँड लोकांच्या पसंतीस पडला आणि पूर्व भारतात प्रासिद्ध झाला... 
१९८० मध्ये त्यांच्या मुलाने सिद्धार्थ रॉय ने कंपनी मध्ये एन्ट्री केली... सध्या खादिम कंपनीचे २३ राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण ८५३ रिटेल दुकानं आहेत... कंपनी च वैशिष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला पेलवेल आणि आकर्षक अशा चप्पल्स, त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त ग्राहक वर्ग हा मध्यम वर्गातील माणूस आहे... 
वयाच्या ८३ व्या वर्षी  ७ डिसेंबर २०१३ मध्ये सत्यप्रसाद रॉय बर्मन यांचे निधन झाले. त्यांनी सुरू केलेली 'खादिम इंडिया' कंपनी आता देशात एक ब्रँड झाली आहे.
भारतात आज पर्यंत जेवढे असामान्य लोक घडले आहेत त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर लक्षात येत या पैकी कोणालाच वारसा हक्काने काहीच भेटलं नाहीये त्यांच्या मध्ये जिद्द  तरी नवीन करून दाखवायची आणि म्हणून ती लोक सामन्यातून असामान्य झाली... त्यांनी छोट्यातल्या छोट्या कामापासून सुरवात केली कोणत्याच कामाची लाज नाही बाळगली... आता हेच जर बर्मन साहेबांनी चप्पल च्या दुकानात काम करायला स्वतःला छोटा ठरवलं असतं तर त्यांना कदाचित स्वतःचा ब्रँड सुरु करावा असा वाटलं नसत किंवा स्वतःच उत्पादन सुरु करतांना त्यांना ज्या काही अडचणी आल्या असत्या त्याच त्यांच्या कडे उत्तर नसत त्यांनी दुकानात काम केलं म्हणून त्यांना बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या... 

No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...