Friday, September 21, 2018

रचना


मैत्रीण म्हणजे काय हे समजत नव्हतं तेव्हा पासून ची दोघींची मैत्री ... कोणीही विचारलं ना तुम्हाला कोण कोण मैत्रिणी आहे तर त्या एकमेकींचंच नाव सांगायच्या ... जस जस मोठ्या झाल्या वर्ग बदलत गेले तस त्या पण दुरावल्या  मनाने नाही तर शरीराने तस त्या कधीच एका वर्गात नव्हत्या  कि एकमेकींच्या घराजवळ हि राहत नव्हत्या.. 
कशी झाली त्यांची मैत्री माहित नाही हे त्यांनाही आठवत नाही पण आज हि ती टिकून आहे... 
त्या काही रोज भेटत वगैरे नव्हत्या , रोज च तर सोडाच पण वर्षातून एकदा भेटता अस म्हटलं ना तरी चालेल...
पण जेव्हा केव्हा भेटता ना सगळं शीण विसरून जातात... त्यांच्यात कधी भांडण झालेलं आठवत नाही की कधी अबोला धरलेला... अस कस होऊ शकत ना इतकं कोणी कधी परफेक्ट असत का पण त्या आहेत... कधी कोणाची चुगली नाही की मागे पुढे बोलणं नाही... त्यांना तसा फरक पण नाही पडत... 
दिवस सरत होते तस दोघींच शिक्षण पूर्ण झालं... त्यात ल्या एकीचं लग्न ठरलं सुद्धा आणि दोघीनांही बैचैन झालं... सगळ्यात आधी तिलाच समजलं होतं लग्नाचं, तेव्हा पासून तिने आपल्या मैत्रिणीच्या लग्नाची तयारी सुरु केली होती... हिला जेवढा इंटरेस्ट नव्हता तेव्हढ्या च जोमाने तिने तयारी सुरु केली होती तिची, अगदी designer shops पासून तर makeup man  पर्यंत.. हि सुद्धा तिच्या वरच dependent होती... हिला असा हि कधी इंटरेस्ट नव्हता नटण्यात पण लग्न आहे म्हणून तिने तीच ऐकलं...साखरपुड्या चा दिवस आला आणि makeup सुरु झाला पण जेव्हा तो संपला होता तेव्हा makeup पूर्ण पणे फसला होता... सगळे तोंडावर खूप छान दिसते असाच करत होते पण फक्त तिची च मैत्रीण होती तिला वस्तुस्थिती सांगणारी आणि तेव्हा च तिने तिच्या लग्नाच्या makeup चा जणू विडा च हाती घेतला होता...
दिवस भराभर सरत होते आणि लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तस तस हिला अजून च धडकी भरायला लागली आपलं कस होणार याची...ती हिच्या घरी ८ दिवसांपासून आली होती.. सगळं काही बहिणी सारखं केलं होतं तीच कसली हि कमी पडू दिली नव्हती आणि लग्नाच्या २ दिवस आधी हिने रडून रडून सगळ्या घराला काळजीत पाडलं होत तेव्हा तर तिची मैत्रीण अशी रडली होती कदाचित स्वतःच्या लग्नात पण इतकं रडणार नाही... आणि लग्नाचा makeup तर काय छान झाला होता तेव्हा कुठे तिला बरं वाटलं होतं...तिच्या च चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पण एकी कडे आता आपली मैत्रीण आपल्याला सोडून जाणार म्हणून तेव्हडी च दुखी हि होती...तिने प्रत्येक वेळेस हिला साथ दिलीये.. 
खूप भारी मैत्रीण आहे ती.. हिला अजूनही express होता येत नाही पण हिच्या हि मनात तेव्हडीच भावना आहे तिच्या बद्दल... 
इतक्या वेळापासून मी जिचं गुणगान गातेय ना तीच नाव आहे रचना माझी मैत्रीण आणि हो आज तिचा च वाढदिवस आहे पण मला तिच्या साठी साधा विडिओ सुद्धा बनवता नाही येत कारण तिलाही माहित आहे माझा स्वभाव, ती नाही राग भरणार याची पण खात्री आहे मला.. पण हा  ब्लॉग मात्र फक्त तिच्या साठीच लिहिलाय... 
surprise rachana ... wish u a many many happy returns of the day ... ☺☺☺

No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...