Saturday, October 13, 2018

दिल है छोटासा छोटीसी आशा

गणपती उठले आणि घट बसले सुद्धा... किती पटकन दिवस गेले बाई  स्वतःच आवरायला जरा सुद्धा वेळ भेटला नाही सगळा वेळ  घर आवारण्यातच गेला.. हा संवाद आपण ऐकला च असेल ... हो हो आपलाच आहे तो ... पुरुषांना काय त्याच नवरात्र आली कि फक्त स्त्रियांवर जोक्स टाकायचे... जाऊदे ग तिकडे सगळी काम , राहूदे तो जरासा पसारा, मुलं आता मोठी झालीये बघतील त्यांचं ते.. तू थोडी आरशासमोर उभी रहा बघ जरा स्वतःकडे... कोणाची आहेस तू ?? नाही ना आठवत, मग जरा विचार कर, राहूदे  नको विचार करुस, वेळ जाईल त्यात आता लागलीच कामाला  लाग  स्वतःसाठी जगण्याच्या.. बघ तर खर एकदा करून किती छान वाटतंय... जाऊदे ते त्यांचे टोमणे...  
एकदा जरा स्वतःच्या ठेवणीतल्या साड्या बघ , बघ किती गुदमरायला झालंय त्यांना... काढ त्यांना बाहेर नेस रोज नवीन एक साडी... हलकासा च make up कर बघ किती खुलला आहे चेहरा... जगून घे देवीचे नऊ दिवस बघ ती पण किती प्रसन्न होईल तुझ्यावर... 
वर्षाच्या ३६५ दिवस आई वरून शिव्या देणारे सुद्धा ९ दिवस मातेची मनोभावे पूजा करतात त्यांना जर देवी प्रसन्न होणार असेल तर मग तू तर परिपक्व आहेस ग तुझ्या मनात तर इतकूस सुद्धा पाप नाहीये तू तर निःस्वार्थ पणे कुटुंबासाठी झटत असते तुझ्यावर देवी का नाही खुश होणार... 
नेस तू ९ दिवस ९ रंगाच्या साड्या ... म्हणूदे पुरुषांना आपल्याला रंग बदलणारा सरडा, काही फरक पडत नाही आपल्याला ... सुंदर बाई दिसली कि कोण कशे रंग बदलतो याची त्यांना आठवण राहत नसेल.. म्हणूदे त्यांना आपल्या जिभे ला शस्त्र, हेच शस्त्र तर आपल्या कमी येत आपल्या अडचणीत नाही तर ते आहेच आपल्यावर त्यांचा पुरुषी अहंकार गाजवायला... 
घे तू मनमुराद गरबा खेळून बेधुंद होऊन नाच, तू तर देवीच्या जागरणात नाचणार आहेस ते तर दारू ढोसून कुठल्याश्या बार मध्ये नाचत असतात... ह्या लेखाचं शीर्षक वाचून च तुला गुणगुणावंस झालं असेल, मोठ्याने गाणं गाऊन बघ, बघ किती छान वाटतंय... 
कोणी काही म्हणणार नाही तुला तू फक्त तुझ्या साठी जग आता नाही तर नंतर शरीर साथ देणार नाही आणि मग आठवेल तुला आपल्याला स्वतःसाठी जगायचं राहून गेलं... छोट्या छोट्या आशाआहेत तुझ्या जीवनाकडून तुलाच पूर्ण करायच्या आहेत कोणी नाही कोणासाठी तू मात्र असतेच सगळ्या साठी याचा विसर पडलाय बाकीच्यांना... जाऊदे तू सक्षम आहेस तुझ्यात देवीचा वास आहे.. बघ पटतंय का... 

1 comment:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...