Friday, February 15, 2019

व्यर्थ ना हो ये बलिदान !!!





२ दिवस झाले आता पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याला... सगळ्यांनी आपापल्या परीने श्रद्धांजली दिली... पण श्रद्धांजली वाहिली म्हणजे आपलं कर्तव्य संपलं अस असत का ? काल फार्मा कंपनी मध्ये काम करणाऱ्या मुलाने फेसबुक वर पोस्ट टाकली  'हि तर surgical strike ' त्याला कामावरून काढण्यात आले पण याचा अर्थ काय घ्यायचा आपण आपल्याच देशात आपले शत्रू ठेवले आहे? सिद्धू म्हणतो दहशत वाद्याला देश नसतो... हे समर्थन का करत आहे... निदान आपण ज्या देशात राहतो ज्या देशाने आपल्या कलेला उचलून धरलं आहे त्या देशातल्या जनतेचा तरी थोडा मान ठेवायचा...
बाकीच्यांचं जाऊद्या हो एक वेळ पण काय झालं surgical strike करून सुद्धा URI ची पुनरावृत्ती झाली च ना किंबहुना जास्त जवान शहीद झाले... त्यांची हिम्मत च कशी होते पुन्हा हल्ला करण्याची बरं आपण त्यांच्या वर कितीही विश्वास ठेवा ते आपल्याला परत परत दगा देतातच ...भारत इतका कनवाळू देश आहे असा मला नाही वाटत... याला कायमचा उपाय शोधायलाच पाहिजे...
आपल्या देशावर हल्ला झाला कि आपण निषेध व्यक्त करतो... मोर्चे काढतो... आणि शांत बसून बघत बसतो... 
हे राजकीय पक्ष देशात छोट्याशा कारणावरून 'भारत बंद' करू शकता ... इथे शक्ती वाया घालवण्या पेक्षा तिकडे काही तरी करून दाखवावं त्यांनी... आमदार खासदार होण्यास पात्रतेच्या अटी मध्ये जर घरातला एक तरी सदस्य सैन्यात हवा अशी अट टाकण्यात अली तर जास्त चांगलं होईल...  
आपला देश विकसनशील देश आहे... चांगल्या रीतीने प्रगती करत आहे.. नवीन शोध लावले आहे... सक्षम आर्मी आहे... आज पर्यंत ह्या देशात इतके दहशतवादी हल्ले होऊन सुद्धा आपल्या मुलाला सीमेवर पाठवायची तयारी आहे त्या मातेची... मग सरकार वाट कसली बघत आहे... का म्हणून त्या आई ने अर्ध शरीर स्वीकारावं जर तुम्ही अर्धा इंच भरत नाही म्हणून नाकारतात सैन्य भरतीच्या वेळेस... याचा विचार सरकारने करायला च हवा... 
श्रीलंका आपल्या पेक्षा कित्येक पटीने छोटा देश आहे... सैन्य तर अगदी थोडं आहे पण त्यांनी त्यांच्या देशातील दहशतवाद चा प्रश्न कायमचा मिटवला आहे... 
आपण कसली वाट बघत आहोत... आपण का इतका वेळ घेतो... 
सरकार नक्कीच लवकर काय तो निर्णय घेईल याची अपेक्षा आहे भारतीयांना... 






तुमच्या मताची अपेक्षा 
जय हिंद !

1 comment:

  1. बरोबर आहे तुमचं काही तरी फायनल डिसिजन घ्यायला पाहिजे सरकारने..

    ReplyDelete

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...