Friday, February 15, 2019

डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी





डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी कालच चित्रपट प्रकाशित झालाय... बऱ्याच लोकांना माहीतही नसेल... हा पण त्यांना हिंदी चित्रपट विचारा लगेच सांगतील... हीच तर खरी खंत आहे मराठीचित्रपट श्रुष्टीची... 
आनंदीबाई जोशी!!! भारतीय पहिल्या महिला डॉक्टर... चित्रपट खूप छान आहे खूप मेहनत घेतलीये कलाकारांनी त्यांच्या मेहनतीला फळ येईल जर तुम्ही सिनेमा गृहात जाऊन चित्रपट पहिला तर... 
आनंदीबाईची जिद्दीला तर सलाम आहे पण जस प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एक पुरुष असते हे गोपाळराव विनायक जोशी यांनीं १८०० च्या काळातच सिद्ध करून दाखवलं आहे... आजही २० व्या शतकात प्रत्येक आई मुलीला शिकवतेच तू किती जरी मोठी अधिकारी झाली तरी तुला भाकरी थापाव्याच लागतील... त्या आई च काही चुकीचं नाही म्हणा आज च्या पुरुष मंडळींची विचार सारणीच तशी आहे हा सगळे च नाहीत तसे पण अजून हि असे पुरुष आहे ह्या जगात... त्यांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा... 
चांगल्या चित्रपटाची प्रसिद्धी झालीच पाहिजे... 

No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...