Tuesday, February 19, 2019

एक स्त्रीच दुसऱ्या स्त्री च्या अधोगती च कारण आहे?



खरा विजेता कोणाला म्हणाल हे तुम्हीच मला सांगा... 

एका वृत्तपत्राद्वारे एक स्पर्धा जाहीर केली गेली फक्त स्त्रियांसाठी च... ५ जणी शेवटच्या राऊंड ला गेल्या... त्यात सगळ्याच आपापल्या ठिकाणी सर्वोच्च होत्या पण प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रात अव्वल असेलच अस तर होत नाही ना ...  आता त्यांना price  distribution  च्या कार्यक्रमात बोलण्या साठी आयोजकांनी सांगितलं होत म्हणून त्यांनी आधीच तयारी करायची ठरवली आणि त्यांनी आपला एक whatsapp group ओपन केला... त्या ५ जणींच्या group मध्ये एक पंचविशीतली मुलगी होती आणि बाकी ३५-४० शीतल्या... त्यांची एका technical topic वर  चर्चा सुरु होती त्यात बाकी जणींना थोडे प्रश्न पडले होते ते चर्चा करतच होत्या आणि हिने ते पाहिलं, तिला सोलुशन माहित होत म्हणून हिने लगेच त्यांना सांगून टाकलं ... तिने असा विचार नाही केला कि यांना न सांगता आपण उद्या  जास्त चांगल्या रीतीने स्वतःला present करू शकू... पण त्या बाकी जणींनी तिला ignore केलं जेव्हा आयोजकांनी same solution दिलं तेव्हा त्यांना थोडं awkword झालं... 
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरवात झाली त्यात त्या चौघींनी तिला एकटंच पाडलं होत तिला थोडं वाईट वाटलं... ह्या गोष्टींचा विचार न करता तिने तीच बेस्ट दिल आणि सगळ्यांचं मन जिंकलं... 
आता वाईट बाकी चौघींना वाटत होतं... 
काय हरकत होती जर त्यांनी तिला प्रोत्साहन दिल असत तर नवीन पिढी जास्त update आहे मग त्यांच्या कडून काही शिकायला भेटत आहे तर शिकावं ना... नवीन पिढीचं तास नाहीये ते जे समोर शिकण्या सारखं आहे ते सगळं आत्मसात करत असतात... 

३-४ वर्षांपूर्वी T.V. वर एक ad लागायची... असच काहीस दाखवलं होत त्यात...आज काल fashion  बदलत चालली आहे त्यात एक थोडे छोटे कपडे घालून मुलगी जातांना दाखवलं आहे आणि तिच्या कडे एक मुलगा वाईट नजरेने बघत असतो तेव्हा गॅलरी मधून बघणारी एक वयस्कर बाई त्या मुलीलाच रागवत असते... असे २-३ उदाहरण दाखवून ad च्या शेवटी हेच सगळं उलट दाखवलं आहे म्हणजे जर त्या बाई ने त्या मुलालाच रागवलं असत आणि त्या मुलीच्या कपड्यांच्या चॉईस ला प्रोत्साहन दिल असत तर जास्त चांगलं झालं असत... आठवली का ad ???

पण आजही  तीच परिस्थिती आहे... एक बाईचं दुसऱ्या बाईच्या प्रगतीवर जळत असते... आज बऱ्याच घरात सासू सुनेचं भांडण दिसत कशावरून तर सासू म्हणते आमच्या वेळेस असं नव्हतं म्हणून सुनेला पण तास करू द्यायचं नाही का अहो पण तुमच्या काळात नव्हतं आणि तुम्ही ते करायचा प्रयत्न सुद्धा केला नसेल पण आजची मुलगी प्रयत्न करते आहे नवीन सगळं शिकण्याची मग काय हरकत आहे... 

आज कितीतरी बायका विविध क्षेत्रात काम करत आहे पण कुठे तरी त्यांची मानसिक स्थिती बदलत आहे अस वाटत आहे... काय होणार आहे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळून समोरच्या व्यक्ती मध्ये आपल्या पेक्षा काहीतरी चांगले गुण आहे आपणही ते आत्मसात केले पाहिजे असा विचार करून बघा मुली अजून प्रगती करतील... 


(तुम्हाला काय वाटत जरूर कळवा !
धन्यवाद !!!)

No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...