Wednesday, February 20, 2019

कातरवेळ


वैरी मेली कुठली उगाच नाही म्हणत तिला...होत्याच नव्हतं करून टाकते अगदी... अशाच एका कातरवेळी का कुणास ठाऊक खूप बैचेन होत.. मनात वाईट साईट विचारांनी काहूर मांडलेलं असत.. मग माणूस कधी भूतकाळात शिरतो त्यालाही कळत नाही... मग मनात खोलवर सुरु होतो खेळ गप्पांचा... भांडत बसतो भूतकाळ आणि वर्तमानकाळ... 
भूतकाळ : तुला म्हणत होतो तू जे काही करत आहे ते चुकीच आहे. 
वर्तमानकाळ : काय चूक आहे चांगलंच झालं कि माझं. 
भूतकाळ : हे असं समजवून घेत आली ना स्वतःला म्हणून कोणी विचार करत नाही तुझा.  
वर्तमानकाळ : तस केलं नाही तर माझा थारा च लागणार नाही ह्या जगात. 
भूतकाळ : अगं दुसऱ्या साठी झिजावं गं पण इतकं हि नाही कि तो आपल्याला लाकूड समजून बसेल. 
वर्तमानकाळ : हम्म....अ  ......  .... ........ 
भूतकाळ : चंदन आहेस तू चंदन कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते... अगं पण ऐकलं असत माझं तर काय बिघडलं असत अजून चांगलं झालं असत. 
वर्तमानकाळ : अरे पण अजून चांगलं म्हणत म्हणत कुठे तरी थांबावं लागत च ना नाही तर हातातली गोष्ट निसटून जाते. 
भूतकाळ : कुठेतरी म्हणजे चांगल्याच ठिकाणी थांबायला लावल असत तुला. 
वर्तमानकाळ : नशीब नेहमीच साथ देईल असं होत नाही नेहमी. 
भूतकाळ : नशिबाचे धडे तू नको देउ गं मला... किती कष्ट केलेत तू माहित आहे मला आणि अजून केले सुद्धा असते. 
वर्तमानकाळ : खरंच थांबायला हवं होत का? 
भूतकाळ : आता तू फक्त विचार च करत बस त्याचा ऐकलं नाही ना माझं... 
वर्तमानकाळ : जाऊदे ना कोणत्या वेळी तू पण काय घेऊन बसलाय. मी रमलीये इथे. छान आहे सगळं. 
भूतकाळ : बस स्वतःची समजूत काढत मी जातो. आठवण अली कि बोलव लगेच येईल तुझ्यासाठी. 
वर्तमानकाळ :  अ..... ..... 
बिचारा भूतकाळ फक्त आतून ओरडत राहिला वर्तमानकाळाला त्याचा काही एक फरक पडला नाही. 
भूतकाळ अजूनही मनात काहूर मांडत होता पण अजून काही बोलायच्या आधीच वर्तमानकाळातील कामाचा ढीग आठवून भूतकाळाला धुडकावून लावते आणि मूग गिळून कामाला लागते विचार करत भूतकाळाच खरं झालं असत तर???? 

No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...