Thursday, March 7, 2019

स्त्री सशक्तीकरण


आधुनिक काळातील स्त्रीला उद्देशून...
का गं दमलीस का?
दमून कस चालेल...
का? हे विचारानं सुद्धा पाप आहे तुझ्या साठी...
तुला तर अजून खूप काही जिंकायचं
तू नाही थांबू शकत...
नीट कपडे घाल ग बाई
या जगाची तुझ्यावरच वाईट नजर आहे...
तू एक मॉडर्न युगातील आहेस
मग काय झालं? संस्कार ते संस्कार च
विसरायचं नाहीस...
तुला सतत स्वतःला सिद्ध करावच लागेल
तुझे स्वप्न... छे गं तुझ्यासाठी तुझ्या आई बाबांनी पाहिलेलं स्वप्न
तुला च तर पूर्ण करायचं
तू तुझं कर्तव्य पार पडलास, स्वप्न पूर्ण करून
आता त्यांची वेळ ते त्यांची जबाबदारी पाडतील
नव्याचे नऊ दिवस हवेत जातील मग प्रश्न उभा राहील अस्तित्वाचा
हो गं माहित आहे तुला स्वतःचे मतं आहेत
पण पुरुषप्रधान संस्कृती गं आपली, इथं थारा नाही
YOU ARE TAKEN FOR GRANTED
चूल आणि मुलं असं काही नाही ग राहील आता पण
तुझं जगणं हे फक्त दुसऱ्या साठीच
तरी एक दिवस येईल आपलेच वाटणारे माणसं विचारतील
तू काय केलंस आमच्या साठी ???
तू कोलमडू नकोस तू मुळूमुळू रडणार्यां मधली नाहीस
धडा घे आणि मार उंच भरारी परत एकदा
आता मात्र नको करुस कोणाचा विचार
परत चूक नको...
तू समर्थ आहेस स्वतःसाठी
घडव परत एकदा नवीन इतिहास तुझ्या मुली साठी
तुझ्या भूमीसाठी...


मग परत प्रश्न उभा राहतो असं कितीदा एका स्त्री ला ह्या एवढ्या मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागणार ???
कितीवेळेस अस तिने स्वतःला सिद्ध करावं???
एकदा मुलगी म्हणून एकदा बायको ,सून(आई वडलांचा उद्धार नको म्हणून ) नंतर आई म्हणून शिवाय तीच स्वतःच काही तरी समाजात स्थान असतंच तेही तिला कायम सिद्ध करावं लागत...
हं ती दाखवत नाही, ती सांभाळून घेते...
एकदा विचार करून बघा तिचा तिच्या बाजूने, एकदा स्वतःला ठेऊन बघा तिच्या जागेवर...
किती चिडचिड होईल बघा...
नाही तुम्ही नाहीच घेऊ शकत समजून कारण देवाने तिला वेळ काढून बनवलं आहे म्हणून ती परिपूर्ण आहे तुम्ही तसे होणे नाही

तरी ती खंबीर असते स्वतःला सिद्ध करायला न डगमगता

 प्रश्न उभा राहतो च खरंच स्त्री सशक्तीकरण झालंय ????

 GRAND SALUTE TO ALL WOMEN...

5 comments:

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...