Saturday, March 30, 2019

गुढीपाडवा अन नीट बोल गाढवा!!!

मराठी नव वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा!!!

ह्या वर्षी म्हणजेच ६ एप्रिल २०१९ ला गुडीपाडवा आहे.
 
महाराष्ट्रा सह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक मध्ये मोठ्या धुमधडाक्यात नवं  वर्षाच्या जल्लोषात साजरा केला जातो.
महाराष्ट्रात गुढीपाडवा
आंध्रप्रदेश, तेलंगणा मध्ये उगादी
आणि सिंधी लोक चेटीनंद नावाने ओळखला जातो


गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. म्हणजेच ह्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केल्यास लाभदायी ठरते.

चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण शालिवाहन नावाच्या योध्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते... पुढे याच राजाच्या नावाने नवीन कालगणना 'शालिवाहन शक' चालू झाला..

प्रत्येक घराची गुढी आकर्षक असते. गुढी ची रचना हि आकर्षक असून या मागे शास्त्र सुद्धा आहे.

एका लांब बांबू च्या काठीवर टोकाला रेशमी वस्त्राने गुंडाळले जाते त्यावर कडुनिबांची डहाळी, हरडे करडे        ( साखरेची गाठी ), आंब्याचे पान, फुलांची माळ बांधून त्यावर तांब्याचा/कास्याचा/चांदीचा  कलश ठेवला जातो.. हि गुढी उंच ठिकाणी पाटावर ठेवून बांधली जाते.. जिथे गुढी बांधायची ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढून गुढी उभारली जाते ... उंचच उंच गुढी आकाशाच्या दिशेने झेप घेताना दिसते..

काही ठिकाणी गुढीला ऊन लागायच्या आधी गोडा धोडाचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवायची प्रथा आहे तर काही ठिकाणी सूर्यास्ताच्या आत गुढी उतरवली जाते.

आरोग्य दृष्ट्या महत्व असलेली कडुनिंबाची पान आंघोळीच्या पाण्यात घालून स्नान केल्यास फायदा होतो.
असा हा सण उभ्या महाराष्ट्रात  अजूनही बऱ्याच ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा होईल.





No comments:

Post a Comment

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...