Tuesday, April 30, 2019

"NOTA" दाबावस वाटलं

ह्या २०१९ च्या लोकसभा मतदान साठी मला नाही वाटलं मतदान करावस. "नोटा" बटण वापरावस वाटलं. 
माझ्या सारख्याच अनेक तरुणांना सुद्धा नाही वाटलं  मतदान करावस.
"नोटा" म्हणजेच "none of the above" option, याने तुमचं मत वाया जात नाही. २०१४ च्या election मध्ये ६७ लाख लोकांनी  ह्या option ला पसंती दिली होती. 
का कुणास ठाऊक एका बाजूला उत्सुक असलेला तरुण वर्ग नवीन बदलाची अपेक्षा असलेला आणि एका बाजूला आमच्या सारखे काहीच होऊ शकत नाही आपल्या एका मताने जाऊद्या. 
पण मत वाया जावं अशी इच्छा मुळीच नव्हती. 
अशाच संमिश्र भावना घेऊन मतदान केंद्रावर पोहचले तर मतदार यादीत नाव च सापडेना. खूप राग येत होता आपल्या निवडणूक आयोगावर आणि उमेदवारांवर सुद्धा. 
कारण हेच उमेदवार गेल्या महिनाभर मत मागण्या साठी दारोदार फिरत होते, मग त्यांनी हि काळजी घ्यायला हवी होती कि आपल्या प्रभागात असलेल्या मतदारच मतदान यादीत नाव आहे कि नाही. 
मतदार यादीत नावच नाही म्हणून थोडा आनंद झाला वाचलो आता मन खात नाही राहणार मतदान केलं नाही म्हणून. 
का करायला हवं मतदान ???
कुठे दिसतोय विकास? 
आम्हाला काय फायदा झाला ? 
आम्हीच बेरोजगार म्हणून पडलोय सरकारी नौकरीच्या नादात.  
इथे आम्हाला च फायदा होत नाहीये तर आमच्या पुढच्या पिढीचं काय होईल? 
आम्ही जस तस गप्प बसून सहन करतोय (चूक आमचीच आहे ). मग मी का वेळ वाया घालवू माझं नाव मतदार यादी मध्ये शोधण्यात ? अरे कित्येक लोकांचं तर फॉर्म भरून सुद्धा नाव येत नाही म्हणजे कमालच झाली कि नाही? एकाच व्यक्तीच नाव ६७ वेळा कस काय येऊ शकत?
अजूनही बोगस मतदान होतच. 
भर उन्हात रांगेत उभे रहा आणि आपला नंबर आला कि  EVM मशीन च बंद पडणार. किती फालतुगिरी म्हणावी आणि देश डिजिटल झालाय म्हणे. 
हो माहितीये आधी कर्तव्य बजवावं लागत आणि नंतर हक्काची अपेक्षा करावी.. अहो पण असं कर्तव्य काय करायचं ज्याचा उपयोग च नाही होणार. 
प्रचाराच्या वेळेस हे मोठं मोठाले जाहीरनामे घेऊन येतात नंतर कुठे जातात ते जाहीरनामे? सांगा बरं तुम्ही कधी ह्या खासदारांना निवडून आल्यावर तुमच्या गल्लीत तरी उभं राहिलेलं पाहिलं आहे का ? अहो कित्येक जणांना तर तो कसा दिसतो हे सुद्धा माहित नसते.. 
त्याला कसं समजणार आपल्या अडचणी? 
चाललंय तस चालूदे म्हणत घरी परत आले, T.V. चालू केलं तर news मध्ये पण तेच कमी मतदान झालंय. 
कस होईल जास्त आणि का अपेक्षा करता तुम्ही. 
जिंकून आल्यावर फायदा तर तुमचाच होणार आहे ना मग तुमच्या मतदारांचा थोडा मान ठेवावा. तुम्ही मतदानाच्या दिवशी त्यांना नाव शोधण्यासाठी फिर फिर फिरायला लावता मग नंतर चे ५ वर्ष तुम्ही दिल्ली वाऱ्या ,परदेश वाऱ्या करत फिरता. 
तुम्ही फक्त आश्वासन देतात, निवडून आल्यावर आपला बँक बॅलन्स वाढवतात या पलीकडे जाऊन एखाद दोन रस्ते बनवतात, स्मशानभूमी बांधतात, त्या साठी तर यांना सरकार कडून निधी भेटत असतो त्यात नवीन काही नाही. 
अरे अजून किती वेड्यात काढणार नागरिकांना ?

1 comment:

  1. एकदम बरोबर नाहीच करायला पाहिजे यांना मतदान फक्त नाटो वापरायला पाहिजे तेव्हा यांचे डोळे उघडतील.

    ReplyDelete

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...